CSSRI केंद्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था

Author:श्री. विनोद हांडे
Source:जलसंवाद, ऑगस्ट 2017

CSSRI- Central Soil Salinity Research Institute

मेरा गांव मेरा देश या प्रोग्राम अंतर्गत प्री-रब्बी किसान गोष्टीचे आयोजन केले होते त्यात हरियाणा , पंजाब, उत्तरप्रदेश, वेस्ट बंगाल आणि गुजरात या राज्यातील जवळ जवळ २००० च्या वर शेतकर्‍यांनी सहभाग घेतला त्यात त्यांना वैज्ञानिक आणि जाणकार लोकांची मते जाणून घेऊन आपल्या शंका समाधाना चे निवारण पण करता आले. तसेच ही संस्था अनेकदा किसान मेळ्यांचे पण आयोजन करते.

केंद्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था ही मुख्य रूपाने अन-उपजाऊ पाणी किंवा लवण मिश्रित पाणी आणि माती याचा शेतीकरिता कसा वापर करून घ्यायचा या विषयावर संशोधन करणारी संस्था . भारत सरकार ने एक इंडो - अमेरिकन संस्थेची स्थापना केली जी मुख्य रूपाने ‘इंडियन कौन्सिल ऑफ एग्रिकल्चर रिसर्च’ ला संपूर्ण देशाचे वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये मदत करेल. या ‘इंडियन कौन्सिल ऑफ एग्रिकल्चर रिसर्च’ ने सुचविलेल्या मार्गदर्शनाचे संपूर्णपणे अनुकरण करायला एका संस्थेची स्थापना करण्यात आली आणि ती म्हणजे केंद्रीय मृदा लावणता अनुसंधान संस्था (CSSRI). ही संस्था सुरूवातीला सार ( हरियाणामधील ) येथे १ मार्च १९६९ मध्ये सुरूवात करण्यात आली पण नंतर ऑक्टोबर १९६९ लाच कर्नाल येथे तिचे स्थानांतर करण्यात आले आणि तेंव्हा पासून ती कर्नाल लाच आहे. सन १९७०च्या फेब्रुवारीत, पश्चिम बंगाल मधील सेन्ट्रल राईस रिसर्च स्टेशन ला पण कर्नाल येथील केंद्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था येथे स्थानांतर करण्यात आले, आणि त्याचा मुख्य उद्देश समुद्री किनार्‍या लगत भागावर लवण मिश्रित पाण्या मुळे शेतीवर होणारे परिणाम याच्या वर संशोधन करणे .

देशातील लवण प्रभावित माती आणि लवण प्रभावित पाणी या विषयावर संशोधन करण्याकरिता संस्थेचे देशामध्ये आधी आठ ठिकाणी केंद्रे होती ती आता बारा ठिकाणी करण्यात आली आहे ती म्हणजे आग्रा (उत्तरप्रदेश) ,बापटाला (आंध्रप्रदेश), बिकानेर राजस्थान), गंगावती (कर्नाटका), हिसार(हरीयाणा), इंदोरे (मध्यप्रदेश), कानपूर ( उत्तरप्रदेश) आणि त्रीचनापल्ली(तामिळनाडू),भटिंडा (पंजाब),पनवेल (महाराष्ट्र), पोर्ट ब्लेअर (अंदमान आणि निकोबार) व वय्ततीला (केरला) येथे.

संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे लवण मिश्रित मातीची विभागणी करून त्याचा डाटा तैयार करणे , त्याचवर संशोधन करणे आणि लवण मिश्रित पाणी शेती करिता वापरणे. त्या करिता संस्थे ने लवण मिश्रित माती मध्ये विशिष्ठ प्रकारचे रसायने टाकून सॉल्ट टॉलरंट तांदूळ, गहू, मस्टर्ड इत्यादी धान्याचे प्रकार विकसित केले आणि अशा प्रकारे जवळ जवळ १.५ मिलियन हेक्टर लवण मिश्रित माती शेती योग्य केली व १५ मिलियन टन धान्याचे उत्पादन करून देशाच्या धान्य उत्पादनात वाढ केली.

लवण मिश्रित मातीत वॉटर लॉगिंग करिता सबसर्फेस ड्रेनेज टेक्नोलॉजी, ही ,आधी हरियाणा करिता विकसित करून त्याला चांगले समर्थन व मान्यता मिळाल्यावर तिचा वापर राजस्थान , आंध्रप्रदेश , गुजरात , महाराष्ट्र आणि कर्नाटकात करण्यात आले. अशा प्रकारे ६०००० हेक्टर वॉटर लॉगिंग जागेचे रुपांतर शेती करिता करण्यात आले.

संस्था वेग वेगळ्या शोध कार्याचे काम पण हाती घेते आणि त्या करिता देशात त्यांचे चार विभाग पण आहे आणि ते आहेत ,

१. सॉइल एंड क्रॉप मॅनेजमेंट डीव्हीजन
२. इरिगेशन एंड ड्रेनेज इंजिनियरींग डीव्हीजन
३. क्रॉप इमप्रुव्हमेंट डीव्हीजन
४. टेक्नॉलॉजी इव्ह्यालुएषण एंड ट्रान्सफर डीव्हीजन

भूजलाची पातळी घसरत असलेल्या भागात कृत्रिम रित्या जल भरणाचे कामात पण ही संस्था अग्रणी असते. बदलत्या वातावरणा मुळे उत्तरप्रदेशातील ऊसाच्या शेतीमुळे ढासळत चाललेल्या भूजल पातळी करिता CSSRI ने ग्राउंड वॉटर रिचार्ज करिता एक वेगळी पद्धत विकसित केली जी आधी मुज्जफरनगर येथे टेस्ट केल्या गेली व नंतर शेतकर्‍या पर्यंत पोहचविण्यात आली. ती म्हणजे ऊसाच्या शेती करिता ड्रीप इरिगेशन .

संस्थेने ऑगस्ट २०१५ मध्ये तीन वेग वेगळ्या भाज्या सिमला मिरची , मिरची आणि टमाटर वर लवण युक्त पाण्यामध्ये कृतीम खत योग्य प्रमाणात मिसळून शेती करायचा प्रयोग केला आणि त्यांना त्यातून पारंपारिक पद्धती पेक्षा उत्तम प्रकारे उत्पादन पण मिळाले. अनेक प्रकारच्या फळां वर पण प्रयोग करण्यात आले किंवा त्यांना लवण मिश्रित माती आणि पाण्याच्या दृष्टीने प्रतिकारात्मक जातीचे ब्रीड तयार करण्यात आले.

CSSRI संस्थेने १४ ऑगस्ट २०१५ ला शाळकरी मुले आणि शेतकर्‍यांना , शाश्वत शेती आणि सुदृढ जीवन या बद्दल त्यांना कळावे म्हणून हेल्दी सॉइल फॉर हेल्दी लाईफ हा विषय धरून एक प्रोग्राम पण केला होता.

सन २०१५ च्या ५ डिसेंबर ला CSSRI संस्थेने कर्नाल येथे सॉइल हेल्थ डे म्हणून साजरा केला ,त्यात २०० शेतकरी आणि ६० वैज्ञानिकांनी उपस्थिती लावली होती. संस्थेने हेल्दी सॉइल ची परिभाषा केली आहे आणि त्यांच्या प्रमाणे,

सॉइल ५० टक्के सॉलिड हवी त्यात २५ टक्के हवा आणि २५ टक्के पाणी असायला हवे.

रचनात्मक रित्या हि ३०-४० टक्के वाळू, ३०-४० टक्के नदी किंवा तलावाचा गाळ आणि ८-२८ टक्के उपजाऊ काळी माती चे चांगल्या प्रकारचे मिश्रण असायला हवे . मातीची झक लेव्हल पण ६.३ -६.८ च्या मध्ये असायला हवी. मुख्य म्हणजे अत्याधिक मात्रेत लवण असायला नको. आणि त्याच बरोबर मातीला सपोर्ट करायला जिवाणू असणे पण गरजेचे आहे.

लवण युक्त माती हि फक्त आपलीच समस्या नसून एक जागतिक समस्या आहे आणि तिच्यात दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे आणि त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर होतो. भारतात पण आजच्या स्थितीला ६.७४ मिलियन हेक्टर लवण प्रभावित भाग आहे आणि भविष्यात त्याचात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे संस्थेचे म्हणणे आहे. पण अश्या हि काही भागाची प्रक्रिया करून तिची उपयोगिता वाढवल्या जाऊ शकते आणि लवण प्रतिकारात्मक झाडे लावून जंगल तैयार केल्या जाऊ शकते व त्याच बरोबर लाकडाची उपलब्धता पण वाढवल्या जाऊ शकते.

संस्थेच्या आणखी एका उपक्रमावर प्रकाश टाकावासा वाटतो तो हा कि संस्थेने थर्मल पॉवर स्टेशन मधून निघालेल्या फ्लाय Ash चा उपयोग , लवण मिश्रित धानाच्या शेतीच्या भागात केला आणि त्यामुळे धानाच्या पिकाच्या उत्पन्नावर चांगला प्रभाव पडून उत्पादनात वाढ नोंदविल्या गेली.

मेरा गांव मेरा देश या प्रोग्राम अंतर्गत प्री-रब्बी किसान गोष्टीचे आयोजन केले होते त्यात हरियाणा , पंजाब, उत्तरप्रदेश, वेस्ट बंगाल आणि गुजरात या राज्यातील जवळ जवळ २००० च्या वर शेतकर्‍यांनी सहभाग घेतला त्यात त्यांना वैज्ञानिक आणि जाणकार लोकांची मते जाणून घेऊन आपल्या शंका समाधाना चे निवारण पण करता आले. तसेच ही संस्था अनेकदा किसान मेळ्यांचे पण आयोजन करते.

संस्थेचे अशे अनेक उपक्रम आहे त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करता येणे शक्य नाही . संस्थेने राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्थरावर सुद्धा अनेक राष्ट्रांबरोबर कामे केली आहे. जसे,

२००१ मध्ये इंडो - डच कोलाबोरेटीव रिसर्च प्रोग्राम वर एक जागतिक दर्जाचे ट्रेनिग सेंटर सुरु केले. २००८ मध्ये इंडो - यु. एस . - BSPII प्रोग्राम सुरु केला. आफ्रिका आणि साउथ आशिया तील गरीब शेतकर्‍याकरिता एक वेगळ्या नस्ल च्या तांदुळाचा शोध केला. वर इंडो - अमेरिकन संस्थेची स्थापना केली याचा उल्लेख केल्या गेला आहेच. आणि इतर बरेच काही देशातील लवण प्रभावित माती आणि कमी दर्जाचे पाणी किंवा आपण त्याला पुअर क्वालिटी वॉटर म्हणू शकतो त्याचा वापर करून देशाच्या धान्य उत्पादनात वाढ करणे हे केंद्रीय मृदा लावणता अनुसंधान संस्थेचे चे उद्दिष्ट आहे. त्या उद्देशाने संस्था वेगवेगळे प्रयोग आणि तंत्रज्ञान विकसित करत असते आणि ते लोकां पर्यंत पोहचविण्याचे काम पण संस्था उत्तम रित्या पार पाडते.

१ मार्च २०१७ ला केंद्रीय मृदा लावणता अनुसंधान संस्थेने आपल्या कारकिर्दीचे ४८ वर्षे पूर्ण केली असून ते आपल्या सुवर्ण महोत्सवा कडे वाटचाल करीत या देशाच्या उन्नती मध्ये त्यांचा निरंतर सिहांचा वाटा राहील असे मानायला हरकत नाही.

श्री. विनोद हांडे, नागपूर - मो : ९४२३६७७७९५