मिशन राहत - मराठवाडा दुष्काळ मुक्ती

10 Aug 2017
0 mins read

रिलायन्स - सी एस आर वेबसाईट वरून

रीलायन्स फाउंडेशनने दुष्काळाच्या तीव्रतेतून काहीशी मुक्ती मिळावी यासाठी प्रदेशात विविध स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहभागाने अनेक उपाययोजनांना प्रारंभ केला आहे. या उपाययोजनांमध्ये दुष्काळामुळे ज्यांचा जीवनाधार धोक्यात आला आहे अशा लोकांपर्यंत पोहोचतील अशा अल्पकालीक दुष्काळ सहाय्यता योजनांचा अंतर्भाव आहे. भविष्यात दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी यासाठी आखलेल्या या योजना अत्युत्तम आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरागत ज्ञान यांचा योग्य मिलाफ करून तयार करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिेगोली, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांची गणना शुष्क प्रदेश म्हणून केली जाते. मान्सूनची वर्षानुवर्षे सातत्याने अपुरी साथ, जमिनीतील पाण्याची खालावलेली पातळी तसेच भूगर्भातील पाण्याचा अती वापर याचे पर्यवसान पाण्याच्या तीव्र दुर्भिक्षतेत व प्रदेशाचे अर्थकारण पंगू होण्यात झाले आहे.

गेली चार वर्षे रीलायन्स फाउंडेशन (आर.एफ.) हे त्यांच्या ग्रामिण परीवर्तन कार्यक्रम या महत्वाकांक्षी कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रात पाण्याच्या विदारक समस्यांवर दीर्घकालीन उपाय योजना उपलब्ध करून देण्याचे कामी कार्य करीत आहे. या शूष्क प्रदेशाची या समस्येतून प्रथम प्राधान्याने सोडवणूक होणे आवश्यक आहे.मिशन राहत - मराठवाडा : आर.एफ. द्वारा १०० गावांची तहान शमविण्यास पाणी टँकर तैनात :

शेतकरी दैन्यावस्थेने विचलीत झाल्याने रीलायन्स फाउंडेशनने मिशन राहत-मराठवाडा या कार्यक्रमास हात घातला आहे. यासाठी आर.एफ.च्या चमुने शासकीय संस्थांच्या सहयोगाने एक अभ्यास हाती घेतला आणि यातून लातूर, हिंगोली, जालना व नांदेड या चार जिल्ह्यांतल्या १०० अती दुर्भिक्ष असलेल्या गावांची निवड केली. फाउंडेशनच्या चमुने या भागात पाण्याचे स्रोत शोधून काढले आणि या १०० गावांतील ५०,००० कुटूंबांसाठी पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची विशेष प्रणाली विकसित केली. प्रत्येक गावाला प्रतिदिन २ ते ४ टँकरचा पुरवठा केला जातो. आर.एफ.ने प्रदान केलेली ही प्रभावशाली प्रणाली न्याय्य व सुरक्षित पाणी पुरवठ्याने आश्वस्त करते. आर.एफ.ने या मिशन राहत मार्फत मान्सुनच्या आगमनापर्यंत टँकरने पुरवठा करण्याचे काम चालू ठेवले.

या शिवाय, आर.एफ.टीमने बीड जिल्ह्यात नोव्हेंबर २०१५ पासून दुष्काळाचा प्रभाव कमी करण्याचे कामी सामाजिक कार्य हाती घेतले असून मराठवाड्यातील २५ खेड्यांमध्ये जन-कल्याणकारी कामांना जोरकसपणे सुरूवात केली आहे.

स्थानिकांसमवेतच्या सहयोगातून उपाय योजनांचा शोध :


रीलायन्स फाउंडेशनने दुष्काळाच्या तीव्रतेतून काहीशी मुक्ती मिळावी यासाठी प्रदेशात विविध स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहभागाने अनेक उपाययोजनांना प्रारंभ केला आहे. या उपाययोजनांमध्ये दुष्काळामुळे ज्यांचा जीवनाधार धोक्यात आला आहे अशा लोकांपर्यंत पोहोचतील अशा अल्पकालीक दुष्काळ सहाय्यता योजनांचा अंतर्भाव आहे. भविष्यात दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी यासाठी आखलेल्या या योजना अत्युत्तम आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरागत ज्ञान यांचा योग्य मिलाफ करून तयार करण्यात आल्या आहेत. सुसूत्र पध्दतीने मदत मिळावी आणि बाधीत लोकांमध्ये स्वयंपूर्णतेची भावना रूजावी यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

आर.एफ.चे कार्य - खालील बाबींकडे विशेष लक्ष :
महिलांना मदत :


परंपरेने, कुटुंबासाठी पाणी आणणे ही जबाबदारी महिलांची आहे असे समजले जाते. त्यांच्यासाठी प्रत्येक पहाट सुरू होते ती इंधन, चारा आणि पाण्यासाठी प्रदीर्घ वणवण करत कष्टदायी शोध घेण्याने. ग्रामिण महिलांना सर्वसाधारणपणे प्रती दिन घरगुती वापरासाठी १५० ते २०० लीटर पाणी १५ किमीची बिकट वाट तीन तीन तास पाऊले तुडवत मिळवावे लागते. अशा शारिरीक कष्टांनी त्यांची तब्येत घसरणीस लागते ज्यातून मुरलेला पंडुरोग, मेरूदंडाच्या विकृती आदी विकार जडण्यास ते कारणीभूत ठरतात. आर.एफ.ने याकडे लक्ष केंद्रीत करून या महिलांना मदत व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातील केज प्रभागातील २५ खेड्यांत २५ टाक्या बसवून प्रथम पाऊल उचलले आहे, ज्याद्वारे २८,००० लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागणार आहे.

जनावरांच्या मदतीतील योगदान :


जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी आठ खेड्यांत ११ पारंपारीक बुडकी तलाव शुष्क तलावांमध्ये खणण्यात आले असून त्याद्वारे ३.२८७ घनमीटर एवढ्या क्षमतेचे पाणी साठे निर्माण करण्यात आले आहेत.

चिरस्थायी उपाय योजना :


सततच्या दुष्काळांपासून बचाव करण्यासाठी रीलायन्स फाउंडेशन ग्रामपंचायतींच्या सहकार्याने विकास योजना तयार करीत आहे. तलाव / नाल्यांमधील गाळ काढणे, जलसंधारणासाठी बांधकामे करणे, जीर्ण तलावांची दुरूस्ती करणे आणि खुल्या विहिरींची बांधकामे करणे असे अनेक कृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. आजपर्यंत छोट्या आकाराचे ३० स्टॉप डॅम्स आणि मातीची जलसंधारण बांधकामे पाच खेड्यांत पूर्ण करण्यात आली आहेत. ज्यातून ३१.७७० घनमीटर क्षमतेचे पाणी साठे निर्माण झाले आहेत.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading