पाणी

18 Feb 2015
0 mins read
water
water

पाणी (H2O) हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला पदार्थ आहे. हैड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव स्वरुपात असते. पाण्याला वास व चव नसते. पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात आढळते. पाणी हे बिनरंगाचे बिनवासाचे आणि चव नसलेले असते.

 

पाणी हे रंगहीन असून प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. पाण्याच्या घन स्वरुपाला बर्फ व वायुरुपाला वाफ असे संबोधतात. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विकद्रावक (Universal solvent) असे संबोधतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading